
All India Kurash Champion
Sakal
अभिजीत पांडगळे
कुर्डुवाडी : माढा तालुक्यातील शिराळ (मा.) या गावाने पुन्हा एकदा कुस्तीच्या आखाड्यात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. शिराळ येथील संस्कृती सदाशिव टोणपे या उदयोन्मुख पैलवान कन्येने छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या सब जुनिअर कुराश (कुस्ती) नॅशनल चॅम्पियनशिप २०२५-२६ स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी केली. तिने २४ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावून संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावली आहे.