

Blood Donation Agitation Over Poor Road Conditions in Madha Taluka
Sakal
माढा : माढा तालुक्यातील उंदरगाव ते केवड गावाला जोडणाऱ्या पुलाजवळील केवड येथील भैरवनाथ मंदिरासमोरील रस्ता दुरुस्तीसाठी करण्याच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात गुरूवारी (ता. ४) सकाळी दहा वाजता रक्तदान आंदोलन केले. यावेळी ३३ जणांनी रक्तदान केले. रस्ता दुरूस्तीच्या मागणीसाठी प्रहारने अनोखे आंदोलन केले. याबाबत संघटनेने तहसीलदार संजय भोसले व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुनील हेळकर यांना निवेदन दिले होते. माढा तालुका व परिसरातील सर्व कारखान्यांमुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तालुक्यातील उंदरगाव ते केवड गावाला जोडणारा पूल तसेच केवड गावाजवळील भैरवनाथ मंदिरासमोरील रस्ता प्रचंड खराब झाला आहे.