
माढा : माढा-कुर्डूवाडी रस्त्यावरील धोकादायक वळणावर दोन दिवसांत दुसरा अपघात झाला असून कांदा घेऊन जाणारा पिकअप उलटला. दोन दिवसांपूर्वीच याच वळणावर एसटी व स्कार्पिओचा गाडीचा अपघात होऊन एक जण ठार झाला होता व १६ जण जखमी झाले होते. शनिवारी (ता. ९) सकाळी याच ठिकाणी कांदा घेऊन जाणारी पिकअप उलटला. यात कोणी फार जखमी झाले नाही, मात्र पिकअपचे नुकसान झाले आहे.