Madha Lok Sabha 2024: माढ्यात भाजप उमेदवाराची कोंडी! भाजपच्या उमेदवाराला मोहिते-पाटील, रामराजे निंबाळकरांचा विरोध

Madha Lok Sabha 2024: शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघाची निर्मिती २००९ मध्ये झाल्यानंतर शरद पवार येथून खासदार झाले.
Madha Lok Sabha 2024
Madha Lok Sabha 2024Esakal

Madha Lok Sabha 2024: शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघाची निर्मिती २००९ मध्ये झाल्यानंतर शरद पवार येथून खासदार झाले. विजयसिंह मोहिते-पाटील २०१४ मध्ये खासदार झाले होते. पुढे मोहिते-पाटलांनी २०१९ ला भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने आता पुन्हा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीला मोहिते-पाटील व फलटणमधून रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोध केला आहे. उमेदवार बदला अन्यथा पराभव झाल्यास आम्ही जबाबदार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

२०१९ चे चित्र

रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप) विजयी मते : ५,८६,३१४

संजयमामा शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस) मते : ५,००,५५०

ॲड. विजयराव मोरे (वंचित बहुजन आघाडी) मते : ५१,५३२

दौलत शितोळे (अपक्ष) मते : १२,८६९

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : ८५,७६४

Madha Lok Sabha 2024
Solapur Lok Sabha 2024: सोलापूरात दोन युवा आमदारांत चुरस; सोलापूरची लेक म्हणून प्रणिती शिंदे मैदानात

वर्चस्व

२००४ : रिपाइं

२००९ : राष्ट्रवादी

२०१४ : राष्ट्रवादी

२०१९ : भाजप

Madha Lok Sabha 2024
Shirdi Lok Sabha 2024: शिर्डीमध्ये शिवसेनेच्या गटांत रस्सीखेच; गेल्या सलग तीन निवडणुकांपासून सेनेचं वर्चस्व

सद्य:स्थिती

मतदारसंघात धनगर, मराठा निर्णायक

भाजपच्या उमेदवाराला मोहिते-पाटील, रामराजे निंबाळकरांचा विरोध

भाजपमधील बंडखोरीकडे सर्वांचे लक्ष

महादेव जानकर महायुतीत गेल्याने ‘महाविकास’च्या उमेदवाराबद्दल उत्सुकता

मागील निवडणुकीतील विरोधक आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे भाजपसोबत

Madha Lok Sabha 2024
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग महायुतीसाठी लढाई कठीण; जागेचा तिढा कायम, ठाकरे शिवसेनेसाठी ठरणार डोकेदुखी

हे मुद्दे प्रभावी ठरणार

कृष्णा-भीमा स्थिरीकरणासह सिंचनाचे प्रश्‍न

मोहिते-पाटील, निंबाळकरांचा विरोध कुठपर्यंत टिकणार?

‘शेकाप’चे डॉ. अनिकेत देशमुख पवारांचे उमेदवार असण्याची शक्यता

नेते सोडून गेले तरीही शरद पवारांचा मतदारसंघावर प्रभाव कायम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com