

Maharashtra Politics Graduate Constituency Result May Influence Madha Lok Sabha Contest as NCP and BJP Assess MLA Support
sakal
सोलापूर : ज्येष्ठ नेते शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून पश्चिम महाराष्ट्राची ओळख आहे. विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही ओळख अंधुक झाली होती. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील हर्षदा देशमुख-जाधव यांच्या विजयाने ही ओळख पुन्हा एकदा रुजली आहे. हा बालेकिल्ला पुन्हा उभारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला काँग्रेसची मोलाची साथ मिळाली. माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या माण (जि. सातारा) विधानसभा मतदारसंघातील देशमुख-जाधव विजयी झाल्याने २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने माढा लोकसभा सेफ केल्याचे मानले जात आहे.