

Madha Chakka Jam Protest By Maratha Activists In Support Of Manoj Jarange Patil Water Samadhi Warning Issued
sakal
माढा: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ माढा येथे मराठा आंदोलकांनी टायर पेटवून चक्काजाम आंदोलन केले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावली-सालसे राज्य मार्गावर ठिय्या देत रास्तारोको करण्यात आला. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली.