

From Soldier Father to Officer Son: Ajit’s Inspiring Journey
sakal
मोडनिंब: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) परीक्षेत माढा तालुक्यातील अरण येथील अजित रणदिवे या तरुणाने बाजी मारली आहे. या परीक्षेत यश मिळवून अजितने संरक्षण दलात माढा तालुक्यातून पहिला उच्चपदस्थ अधिकारी होण्याचा मान मिळविला आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.