Floods, Heavy Rain Affect Madha Taluka Rabi Season Crop
Sakal
माढा : सीना नदीकाठी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची मदत ही काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. फार्मर आयडी नसणे, आधार अपडेट नसणे यासारख्या कारणांमुळे काही शेतकऱ्यांची मदत मिळणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांकडे पैसा उपलब्ध नसल्यानेही पेरणीसाठी शेतकऱ्याने हात आखडता घेतलेला आहे. सीना नदीकाठची पूर परिस्थिती व तालुक्यातील अतिवृष्टी यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अद्यापही वाफशावरती आलेल्या नाहीत. त्यामुळेही पेरणी क्षेत्र घटलेले आहे. उद्या काही दिवसात गहू, हरभरा यासारख्या पिकाच्या पेरणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.