Social Harmony Story:भक्ती आणि मानवतेचा संगम! माढा वारीत सर्वधर्मसमभावाचे दर्शन; पालखीत १५ मुस्लिम बांधवांचा सहभाग

Ashadhi Wari social harmony story : काटेगावच्या पालखीत १५ मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग; माढा वारीत सर्वधर्मसमभाव, सामाजिक समता आणि बंधुभावाचा जिवंत संदेश
Devotion Unites All: Hindu-Muslim Brotherhood Shines During Madha Wari

Devotion Unites All: Hindu-Muslim Brotherhood Shines During Madha Wari

esakal

Updated on

-किरण चव्हाण

माढा: आषाढी वारी ही केवळ भक्तीची नव्हे, तर सामाजिक समतेची आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा जपणारी वारी आहे, याची प्रचिती बार्शी तालुक्यातील काटेगाव येथून निघालेल्या श्री हनुमान मंदिर देवस्थानच्या पालखी सोहळ्यातून पुन्हा एकदा आली. १२५ वारकऱ्यांसह निघालेल्या या दिंडीत १५ मुस्लिम बांधवांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत माढ्यातील कसबा पेठेतील ऐतिहासिक श्री विठ्ठल मूर्तीचे दर्शन घेतले आणि पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com