
सोलापूर : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत (ग्रामीण) घरकुल योजनेतून पुणे विभागात २० लाख घरकुल उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सर्व यंत्रणांनी ताळमेळ ठेवून महाआवास अभियानातील घरकुल १०० दिवसांत पूर्ण करून लाभार्थ्यांना हस्तांतरित करावीत, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी दिले.