

Eknath Shinde's Unfulfilled Promise
Sakal
मंगळवेढा : महायुती सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ग्रामरोजगार सेवकांना आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला मात्र एक वर्षानंतर देखील अद्यापही रोजगार सेवक मानधनाच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारने उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे त्यांच्याच मंत्रीमंडळात असताना अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष केले.