
Solapur: गुढीपाडव्याला श्रीशैलममध्ये होत असलेल्या उगादी (गुढीपाडवा) उत्सवात सोलापूरच्या ४० महिला आणि १०० युवक स्वत: दासोह उभारत पाच दिवस अन्नदानाची सेवा करणार आहेत. मागील १० वर्षांपासून ही सेवा सुरू असली तरी यंदा महाअन्नदासोह सेवा नावाने मोठ्या प्रमाणावर हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री सिद्धेश्वर सेवा संस्थेचे कार्यवाहक सिद्धाराम शेट्टी व गुरुनाथ निंबाळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.