

Over 4,000 Cyclists Join Spiritual Ride in Pandharpur During Ashadhi Wari
sakal
पंढरपूर: आषाढ शुद्ध एकादशी सोहळ्यासाठी राज्यातून अनेक दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत. अशातच महाराष्ट्र व कर्नाटकातून आलेल्या सुमारे चार हजार सायकलस्वारांनी आज वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून हरिनामाच्या जयघोषात नगरप्रदक्षिणा घातली. सायकलपटूंनी नगरप्रदक्षिणा तसेच रिंगण सोहळ्यात सहभागी होत एका अभूतपूर्व अनुभवाची अनुभूती घेतली. या सायकल दिंडीचे उद्घाटन भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे संचालक पांडुरंग चाटे व आषाढी पंढरपूर सायकलवारी असोसिएशनचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी केले. या उपक्रमातून व्यायामासह पर्यावरणाचा संदेश देण्यात आला.farmer Success Story: तळेगाव ढमढेरेच्या ११ महिन्यांच्या उसाला तब्बल ₹५,००० प्रतिटन बाजारभाव; हरियाणापर्यंत झाली विक्री, शेतीतून यशाची गोड कहाणी!