Divyang Marriage Scheme
esakal
सोलापूर : दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी, दिव्यांग आत्मनिर्भर बनावा, विवाहापासून दिव्यांग वंचित राहू नये, यासाठी आता दिव्यांगांना विवाहासाठी शासनाकडून (Divyang Marriage Scheme) अडीच लाख रुपये दिले जाणार आहेत. त्यात पती-पत्नीपैकी एकजण दिव्यांग असल्यास त्यांना दीड लाख रुपये तर दोघेही दिव्यांग असल्यास अडीच लाख रुपये मिळणार आहेत.