
सोलापूर : सोलापूर शहराच्या सुनियोजित विकासासाठी आणि अनधिकृत बांधकामांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी शहरात नव्याने सुरू असणाऱ्या बांधकामांचा पाया व कॉलम उभारणीची तपासणी महापालिकेकडून करण्यात येणार आहे. शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी महापालिकेकडून सुरू आहे. तर शहरात सुरू असलेल्या बांधकामांची माहिती नागरिकांनी महापालिकेला माय सोलापूर ॲपवर कळवावी, असे आवाहन आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.