
सोलापूर : दहावी परीक्षेत एक अथवा दोन विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलैमधील पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. शनिवारी (ता. ७) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे प्रभारी शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी परिपत्रक काढले आहे.