
सोलापूर: शासकीय कार्यालयात सोशल मीडिया वापराचे प्रमाण वाढले आहे. पण सोशल मीडिया वापरताना सामाजिक शांतता भंग होण्याचे प्रकार वाढत आहेत. भविष्यात होणारे परिणाम पाहता शासनाने सोशल मीडिया वापरासाठी आचारसंहिता तयार करून वापरावर टाच आणली आहे. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोफाइल फोटो वगळता इतर ठिकाणची माहिती वा फोटो (उदा. शासकीय वाहन, कार्यालय, इमारतीचे फोटो, रील्स, व्हिडिओ) सोशल मीडियावर टाकता येणार नाहीत, तसा शासन निर्णयच जारी करण्यात आला आहे.