
उ.सोलापूर : राज्य सरकारने पंतप्रधान कृषी विमा योजनेत मोठे बदल केले असून नुकसान भरपाईसाठी पूर्वीचे निकष रद्द केले आहेत. चालू वर्षासाठी पीक कापणी प्रात्यक्षिक प्रयोगावर आधारितच नुकसान भरपाईची रक्कम ठरवली जाणार आहे. एक रुपयात पीकविमा योजना ही सरकारने बंद केली असून शेतकऱ्यांना दोन टक्के हिस्सा भरावा लागणार आहे. मात्र, सरकारच्या या नव्या योजनेत शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे.