Solapur: मोहोळ तालुक्यातील दक्षिण भागात भीमेचा महापूर व मुसळधार पाऊस यामुळे शेती व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र शासनाच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामे करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे..वाघोली मंडलजवळच एका बाजूला असलेल्या भीमा काठावरील मंगळवेढ्यातील माचणूर, ब्रह्मपुरी तर मोहोळमधील कामती मंडलअंतर्गत शेतीचे पंचनामे सुरू आहेत. पाऊस तर सगळीकडेच पडला आहे, मग पंचनामे व नुकसानभरपाईसाठीच वेगळा नियम का ? असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे..Kartik Month Deepdaan: कार्तिक महिन्यात दीपदान का करावे? जाणून घ्या लाभ आणि कोणत्या वस्तूंचे दान करावे.पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उभी पिके वाहून गेली आहेत. अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. अद्याप अनेक शेतात पाणी उभारलेले आहे. जेमतेम असणाऱ्या पिकांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. शेतात वाफसा नसल्याने नव्याने शेती करायची तर कशी ? झालेल्या नुकसानीच्या भरपाईचे काय ? पडलेल्या घरांच्या भिंती कशा उभारायच्या असे एक ना अनेक प्रश्न सामान्य शेतकरी व नागरिकांकडून उपस्थित होत आहेत. .शिवाय भीमेच्या पुरामुळे नदी काठावरील अर्धनारी, बेगमपूर, अरबळी, मिरी, वटवटे भागातील शेतीचे अधिक नुकसान झाले आहे. शासन नियमानुसार अपेक्षित पावसाची नोंद नसल्याने कारण दाखवून महसूल विभागाने वाघोली मंडल अंतर्गत येणाऱ्या बेगमपूर, अर्धनारी, वडदेगाव, इंचगाव, अरबळी, मिरी, येणकी, वटवटे, सोहाळे, वाघोली, वाघोलीवाडी, जामगाव (खुर्द) या गावातील नुकसानग्रस्त शेतीचे महसूल विभागाने पंचनामे करण्यास टाळाटाळ सुरू केली आहे..पालकमंत्र्यांची घेतली भेटजकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी भागातील शेतकऱ्यांसह पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेत, भागातील शेतीचे सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे..Easy Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्याला बनवा काहीतरी हेल्दी! आताच लिहून घ्या ज्वारीच्या पुलावाची सोपी रेसिपी.मंडलातील पाऊसशेटफळ : ५२. ८ मिलीमीटर,वाघोली : ५४,टाकळी सिकंदर ४२.८०पेनुरः ४०.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.