
मंगळवेढा :- महाराष्ट्र विधानमंडळ विमुक्त जाती-जमाती कल्याण समिती जिल्हा दौऱ्यात आज मंगळवेढा तालुक्यातल्या भेटीत बालाजी नगरच्या आश्रम शाळेत झाडाझडती करण्यात आली. भारताचे संविधान कधी स्वीकृत केले हे शिक्षकाला सांगता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न या समितीच्या सदस्यांनी उपस्थित केला.