

Shardiya Navratri Begins in Maharashtra with Ghatasthapana at Tuljapur Mahur Kolhapur and Saptashrungi Temple
sakal
तुळजापूर, माहूर, कोल्हापूर : ‘आई राजा उदो’च्या गजरात राज्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानीमाता, माहूरगड (जि. नांदेड) येथील रेणुकामाता, महालक्ष्मी अंबाबाई, करवीर (कोल्हापूर) आणि सप्तशृंगी माता, वणी (जि. नाशिक) या साडेतीन शक्तिपीठांत आज भक्तीमय वातावरणात घटस्थापना झाली. महापूजा, महाआरतीनंतर नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. रविवारच्या सुटीचा योग साधून नवरात्राच्या पहिल्याच दिवशी या सर्व ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दसऱ्यापर्यंत विविध कार्यक्रमांनी आदिमाया, आदिशक्तीचा जागर सुरू राहिल.