
सोलापूर :आषाढी सोहळ्यासाठी ६ जुलै रोजी पंढरपूरमध्ये २८ लाख भाविक आले होते, असा ग्रामीण पोलिसांचा दावा आहे. या गर्दीत दोन हजार ७७२ भाविक आपल्या नातेवाईकांपासून दुरावले होते. त्यातील २६६० भाविकांची पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांना शोधून भेट घडवून आणली. आषाढी सोहळा नियोजनबद्ध आणि अतिशय सुंदर झाल्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.