

Maharashtra Ration Scheme New Income Rules 53000 Beneficiaries Lose Eligibility Under Daily Earnings Criteria
sakal
सोलापूर: रेशन दुकानातून मोफत किंवा सवलतीच्या दरात धान्य मिळविण्यासाठी आता उत्पन्नाची कठोर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. शहरातील लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपये (दररोज १६२ रुपये), तर ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे उत्पन्न ४४ हजार रुपयांपर्यंत (दररोज १२१ रुपये) असणे आवश्यक आहे. यापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांचे रेशनधान्य बंद केले जाणार आहे.