
सोलापूर : विकसित महाराष्ट्र-२०४७ साठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत आहे. महसूल विभागाच्या विभागस्तरीय सर्वेक्षणाअंतर्गत क्षेत्रीय गटाच्या अनुषंगाने ‘जमीन’ या विषयावर नागरिकांकडून १७ जुलैपर्यंत अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्याअंतर्गत आता आगामी काळात जमीन व मोकळ्या जागांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जाणार आहे.