Solapur : मागण्या मान्य न झाल्यास पाच डिसेंबर पासून रोहयोच्या कामावर काम बंद आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

Solapur : मागण्या मान्य न झाल्यास पाच डिसेंबर पासून रोहयोच्या कामावर काम बंद आंदोलन

मंगळवेढा : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामाच्या अमंलबजावणी कामाच्या टक्केवारी नियुक्त केलेल्या ग्रामरोजगारसेवकांनी गेल्या 15 वर्षापासून कामाच्या शास्वतीसह निश्‍चीत वेतनाबरोबर इतर प्रलंबित प्रश्‍नासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधीकडून दखल घेतली जात नसल्यामुळे अखेर 5 डिसेबर पासून कामबंद आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र ग्रामरोजगारसेवक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदनाव्दारे दिला.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामाच्या अमंल बजावणीसाठी 26 जानेवारी 2008 च्या ग्रामसभेव्दारे ग्रामरोजगारसेवकांची निवड करण्यात आली.मजुरांनी केलेल्या कामाच्या मजुरीवर रोजगारसेवकांना टक्केवारी वर मानधन निश्‍चीत करण्यात आले परंतु या कामावरील मजुरांचे काम मागणी अर्ज,कामावरील हजेरीपत्रक भरणे,भरलेले हजेरीपत्रक पंचायत समितीला सादर करणे आदी कामे करताना मिळणाय्रा मानधनापेक्षा इतर खर्चच जास्त होत असून काही वेळा मिळालेले मानधन हे झालेल्या खर्चापेक्षा कमी असून गेल्या 15 वर्षापासून यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष दिले नाही या कामातून भविष्यात स्थिरता मिळेल या आशेपोटी हे काम करत असून अदयापही 15 वर्षात यांच्या प्रश्‍नाची दखल ना प्रशासनाने घेतली ना लोकप्रतिनिधी घेतली.

त्यामुळे या रोजगारसेवकांच्याच रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला असून सध्या प्रशासकीय पातळीवरील देखील अनेक अडचणीला सामोरे जावे लागत असताना त्यांचे रखडलेले प्रश्‍न सोडवण्याच्या दृष्टीने उदासिनता दिसून येत आहे.या योजनेतून फळबाग,विहीर,घरकुल,तुती लागवड,खेळाचे मैदान,अशी अनेक महत्वाचे कामे करता करुन शेतकय्रांचे जीवनात हरीतक्रांती करता येईल अशा योजना असून या योजनेची जाहीरात मात्र प्रभावीपणे केली जाते.

मात्र अमंलबजावणी करण्यासाठी असलेल्या यंत्रणेचे प्रश्‍न व भविष्यातील शाश्‍वती देताना टाळाटाळ केली जात आहे.यावेळी ग्रामरोजगार सेवकांचे आकृती बंद समायोजन करून शासकीय सेवेत समाविष्ट करावे, रोजगार सेवकांचे वैयक्तिक खात्यावर मानधन जमा करावे, एन एम एस एस अंतर्गत हजर घेण्याचे बंधनकारक असल्यास अँड्रॉइड मोबाईल व दरमहा नेट पॅक प्रदान करावा, कामाच्या ठिकाणी नेटवर्क नसल्यास ऑफलाइन हजरी मान्य करावी, ग्रामरोजगार सेवकांस विमा संरक्षण प्रदान करावे व ग्राम रोजगार सेवकांचे प्रलंबित देयके त्वरित देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत सदर मागण्याचा विचार न झाल्यास पाच डिसेंबर 2022 पासून जिल्ह्यात काम बंद आंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात येणारा आहे.

सदर निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी रोहयो उपजिल्हाधिकारी व प्रत्येक तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दयानंद कांबळे जिल्हाध्यक्ष आदिनाथ ताटे,सुरेश केंगार(मंगळवेढा) अशोककुमार होटकर(द.सोलापूर) प्रकाश पाटील(मोहोळ)मारुती घोगरे(करमाळा) उपाध्यक्ष परमेश्‍वर मोरे सचिव महेश डांगे बीबी दारफळ चे सचिन बारस्कर आदी जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते