Solapur News : राज्यात महायुतीचे येणार ४८ खासदार - तानाजी सावंत

आरोग्यमंत्री प्रा. तानाजीराव सावंत; वाकाव येथे सीना नदीवरील पुलाचे भूमिपूजन
mahayuti 48 leaders will elected for lok sabha election tanaji sawant politics
mahayuti 48 leaders will elected for lok sabha election tanaji sawant politicsSakal
Updated on

माढा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ खासदार महायुतीचे असतील, असे वक्तव्य कुटुंबकल्याण व आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी माढा-उंदरगाव ते चव्हाणवाडी या रस्त्यावर सीना नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या भूमिपूजन व पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचा लोकार्पण कार्यक्रमावेळी गुरुवारी (ता. १८) बोलताना केले.

प्रा. सावंत म्हणाले, की पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. विरोधकांची केवळ अस्तित्व दाखविण्यासाठी धडपड करीत आहेत.

महाराष्ट्रात ‘राईट टू हेल्थ’ हा कायदा आणण्याचा मानस असून, या कायद्याअंतर्गत महाराष्ट्रातील साडे बारा कोटी जनतेच्या आरोग्याची काळजी हे महाराष्ट्र सरकार घेणार असल्याचेही सांगितले. यावेळी माढा न्यायालयाच्या विभाजन करण्यात येऊ नये असे निवेदन माढा प्रशासकीय कार्यालय बचाव समितीने प्रा. सावंत यांना दिले. तसेच कुर्डुवाडी येथील शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे अरविंद पवार, संजय साठे, युवराज परब, लतीफ मुलाणी यासह अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला.

यावेळी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, ज्योती वाघमारे, शिवाजी कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी केले. कार्यक्रमास बेळगाव वाड्रा मठाचे सिद्धनाथ महाराज, संजय कोकाटे, धनंजय सावंत, अनिल सावंत, पृथ्वीराज सावंत, वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत, आनंदराव कानडे, झुंजार भांगे उपस्थित होते.

शिवाजी सावंत यांना विधानसभेत नेणार

यावेळी बोलताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले, माझ्या राजकारणाचे फाउंडेशनच प्रा. शिवाजी सावंत असून त्यांना राज्यसभेवर किंवा विधानसभेत नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे सांगितले.

ठेकेदाराला बक्षीस

या भूमिपूजन केलेल्या पुलाचे काम ११ महिन्यात काम पूर्ण केल्यास ठेकेदारास ११ लाख रुपयांचे बक्षिस देणार असून, पुलाचे काम गुणवत्तापूर्ण करावे‌. प्रत्येक महिन्याला पुलाच्या कामाच्या प्रगतीचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर करावा, असे प्रा. सावंतांनी सभेत सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com