कोठे म्हणाले ! शिंदे साहेबांमुळे मिळतेय पाणी; मंत्री राहिलेल्या दोन्ही देशमुखांनी पाण्यासंदर्भात घेतली नाही एकही बैठक 

4MaheshKotheSushilkumarShinde200919_0.jpg
4MaheshKotheSushilkumarShinde200919_0.jpg
Updated on

सोलापूर : देशाचे केंद्रीय माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी सोलापूर ते उजनी पाईपलाईन करुन घेतल्याने सोलापुकरांचा पाण्याचा प्रश्‍न सुटला. त्यांनी दुसऱ्या समांतर जलवाहिनीचे काम एनटीपीसीकडे ढकलले असतानाही त्यावेळी काही नेत्यांनी त्याला विरोध केला आणि ते काम स्मार्ट सिटीतून करण्याचे ठरविले. आता निधीची अडचण येत असून या पाईपलाईनसाठी आणखी तीन वर्षांचा काळ लागेल. तत्पूर्वी, वडापूर ते सोरेगाव अशी पाईपलाईन केल्यास शहराचा पाण्याचा प्रश्‍न सुटेल, असा विश्‍वास महेश कोठे यांनी व्यक्‍त केला.

सोलापुरच्या माजी मंत्र्यांनीही काहीच केले नाही 
सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी कसा सुटेल, यासंदर्भात माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, सिध्दाराम म्हेत्रे, तानाजी सावंत यांच्यासोबत चर्चा झाली. मात्र, त्यांनी पुढे काहीच ठोस भूमिका घेतली नाही. दुसरीकडे केंद्रात, राज्यात व महापालिकेत सत्ता असतानाही विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख यांनी या विषयावर एकदाही बैठक घेतली नाही. त्यांनी मंत्री असताना हा प्रश्‍न सोडविला नाही, आता काय सोडवतील, असा प्रश्‍नही कोठे यांनी यावेळी उपस्थित केला. आता सभागृहाच्या माध्यमातून हा विषय चर्चा होऊन सभागृहाचा निर्णय शासनापर्यंत पोहचावा म्हणून मी विषय मांडला. परंतु, विषयांची माहिती नसलेले सभागृह नेते श्रीनिवास करली यांना सभागृहात या विषयावर काहीच बोलता आले नाही, असेही कोठे यांनी सांगितले. सत्ताधारी असतानाही सुरेश पाटील यांनी मात्र, याविषयाकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहन केले. 


शहराची पाण्याची गरज सध्या 180 एमएलडी असतानाही शहराला सध्या उजनी धरण आणि टाकळी व हिप्परगा तलावातून 140 एमएलडी पाणी मिळत आहे. आता सोलापूर ते उजनी या समांतर जलवाहिनीचे काम सुरु आहे, परंतु त्यासाठी आणखी तीन वर्षे लागतील. दुसरीकडे टाकळी ते सोरेगाव पाईपलाईन जुनी झाली असून उजनीचीही पाईपलापईन वारंवार गळत आहे. त्यामुळे आगामी काळात नागरिकांना चार- पाच दिवसाआड नव्हे तर आठ- दहा दिवसांआड पाणी मिळेल, असा इशारा कोठे यांनी दिला. त्यामुळे पाणीप्रश्‍नावर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन सरकारदरबारी आवाज उठविण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आता उन्हाळ्याची चाहूल लागली असून सोलापुकरांचा पाण्याचा प्रश्‍न सुटावा या हेतूने मी सभागृहात हा विषय मांडला. मात्र, पक्षाची नाचक्‍की होऊ नये या हेतूने सत्ताधाऱ्यांनी पाण्यापेक्षा बजेट मंजूर करुन घेण्यास प्राधान्य दिल्याचा आरोपही कोठे यांनी केला. राजकीयदृष्ट्या या विषयाचा कोणाला किती लाभ होईल, यापेक्षाही पाणीप्रश्‍न सुटावा यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्‍त केली. 

विमानतळापेक्षाही पाणीप्रश्‍न मोठा 
सोलापूरला आता विमानतळापेक्षाही पाण्याची मोठी गरज आहे. विमानतळापेक्षा पाण्याचा प्रश्‍न महत्त्वाचा असून उद्योजकांना सोलापुरात आकर्षित करण्यासाठी पाण्याचा प्रश्‍न सुटायला हवा, अशी भूमिका कोठे यांनी यावेळी मांडली. उद्योगांसाठी पाण्याची मोठी गरज असून त्यांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी महापालिकेतील सत्ताधारी, विरोधकांसह आमदारांनी सरकारदरबारी रेटा लावण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. वडापूर ते सोरेगाव ही योजना पूर्ण करण्यासाठी 100 कोटी रुपये लागतील, परंतु त्यामुळे सोलापुकरांचा प्रश्‍न सुटेल, असा विश्‍वास असल्याचेही कोठे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com