
महूद : येथील किरण ट्रेडिंग कंपनी या मॉलमध्ये शनिवारी (ता. १९) मध्यरात्री मागील शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपये किमतीचा किराणामाल लंपास केला आहे. वारंवार होणाऱ्या चोऱ्या आणि एकाही चोरीचा न लागलेला तपास यामुळे या परिसरातील चोरांचा आत्मविश्वास बळावला आहे. दिवसा गावगुंडांचा त्रास आणि रात्री चोरट्यांचा धुमाकूळ यामुळे येथील व्यापारी त्रस्त झाले आहेत.