
उ.सोलापूर : दुकानातील साठा व पॉज मशिनमधील विक्री यामध्ये तफावत आढळल्याने सोलापूर शहरातील एका कृषी निविष्ठा दुकानाचा खत विक्री परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. त्याचबरोबर अभिलेख पूर्ण नसलेल्या इतर ११ दुकानाचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत. चालू कृषी हंगामात एकूण १५ दुकानांचे खत विक्रीचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.