Ujani Dam: उजनी धरणाला मोठा दिलासा! अवघ्या चार दिवसांत 'मायनस'मधून 'प्लस'मध्ये; जिल्ह्याच्या पाणीस्थितीत मोठी सुधारणा

Solapur Ujani Dam latest water level news: पश्‍चिम घाटमाथ्यावरच्या दमदार पावसामुळे उजनी धरणाचा उपयुक्त साठा ‘मायनस’मधून ‘प्लस’मध्ये; अवघ्या चार दिवसांत ३१.८९ टक्क्यांपर्यंत झपाट्याने वाढ
Major Relief for Solapur as Ujani Dam Records 31.89% Live Water Storage

Major Relief for Solapur as Ujani Dam Records 31.89% Live Water Storage

sakal

Updated on

सोलापूर: पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरण बुधवारी (ता. ८) उपयुक्त (प्लस) साठ्यात आले असून सायंकाळी सहापर्यंत ३१.८९ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात गेल्या ४८ तासात २३.६१ टीएमसी पाणी जमा झाले. मंगळवारपासून (ता. ७) पाऊस कमी झाल्याने भीमा नदीपात्रात येणारा विसर्ग सायंकाळी कमी होऊन ९२ हजार ८९२ क्युसेक इतका झाला होता. मात्र, त्यात पुन्हा रात्री नऊ वाजता वाढ होऊन तो सव्वालाखावर गेला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com