
अक्कलकोट : मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीतील एकास पोलिसांनी हन्नूर परिसरातून मोठ्या शिफातीने अटक केली. ही परजिल्ह्यातील टोळी मोठा धाडसी दरोडा टाकण्याच्या तयारीत होती. गॅस कटर, साहित्य व चोरी केलेले छोटा हत्ती वाहन आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले. याची अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.