

Senior Shiv Sena leaders in Solapur announcing their resignation amid political unrest.
sakal
सोलापूर: महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात भूकंपसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सकाळी उमटलेल्या ‘दासरी हटाव’च्या नाऱ्यानंतर, सायंकाळपर्यंत पक्षाच्या जिल्हाप्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामा अस्त्र उपसल्याने खळबळ उडाली आहे. अंतर्गत गटबाजी आणि नाराजीचा उद्रेक झाल्याने सोलापुरात मशाल विझण्याची भीती व्यक्त केली जात आहे.