
पंढरपूर : राज्याच्या राजकारणात वर्षभरात मोठी राजकीय उलथापाल होईल, तेही पांडुरंगाच्या मर्जीने असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. मिटकरी शनिवारी (ता. २१) विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पुढच्या वर्षी आषाढीची शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना मिळावा असे साकडे विठ्ठल चरणी घातल्याचे आमदार मिटकरी यांनी सांगितले.