नगरपरिषदांच्या सभांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करा

वेबसाइटवर प्रसिद्ध करण्याचे डॉ. कुलकर्णींचे आदेश
video recording
video recordingSakal

सोलापूर - नगरपरिषदेच्या कामकाजात पारदर्शकता येण्यासाठी राज्यातील सर्व नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते नगरपरिषदेच्या आणि संचालनालयाच्या वेबसाइटवर सात दिवसांत प्रसिद्ध करावे, असे आदेश नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिले आहेत.

यासाठी बार्शी येथील मनीष देशपांडे यांनी जनआंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. नगरपरिषदेच्या सभेत नेमके काय झाले, हे आता नागरिकांना घरबसल्या बघता येणार आहे. या आदेशाचे दूरगामी परिणाम होणार असून खऱ्या अर्थाने नगरपरिषदांचे कामकाज नागरिकांसाठी खुले होणार आहे, अशी माहिती मनीष देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे जिल्हा समन्वयक यशवंत फरतडे, माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर आदी उपस्थित होते.

सभांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रसिद्ध करण्याच्या आदेशामुळे नगरपालिकेच्या सभेत तोंड न उघडणाऱ्या नगरसेवकांची अकार्यक्षमता उघड होणार आहे. मौनी नगरसेवकांचे बिंग फुटणार आहे. नगरपालिकेच्या सभेच्या नियमात सध्या असलेली संक्षिप्त कार्यवृत्तांताची तरतूद ही पारदर्शक कामकाजात अडसर आहे. त्यामुळे त्यात सुधारणा करून संपूर्ण इतिवृत्तांत जाहीर करण्याची मागणी आहे.

- मनीष देशपांडे, जनआंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक, बार्शी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com