esakal | शिष्यवृत्ती परीक्षेत माळशिरस तालुक्‍याचे घवघवीत यश ! गुणवत्ता यादीत आठवीचे 54, पाचवीचे 33 विद्यार्थी 
sakal

बोलून बातमी शोधा

Scholarship

शिष्यवृत्ती परीक्षा 2020 च्या घोषित झालेल्या निकालामध्ये माळशिरस तालुक्‍यातील पूर्व उच्च प्राथमिक गटात 33 व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 54 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून, दोन्ही गटांतील 87 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, जिल्हा परिषदेच्या आंबेमळा खडूस शाळेतील विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत पाचवा आला आहे, अशी माहिती माळशिरस तालुक्‍याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी दिली. 

शिष्यवृत्ती परीक्षेत माळशिरस तालुक्‍याचे घवघवीत यश ! गुणवत्ता यादीत आठवीचे 54, पाचवीचे 33 विद्यार्थी 

sakal_logo
By
अशोक पवार

वेळापूर (सोलापूर) : शिष्यवृत्ती परीक्षा 2020 च्या घोषित झालेल्या निकालामध्ये माळशिरस तालुक्‍यातील पूर्व उच्च प्राथमिक गटात 33 व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 54 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून, दोन्ही गटांतील 87 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, जिल्हा परिषदेच्या आंबेमळा खडूस शाळेतील विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत पाचवा आला आहे, अशी माहिती माळशिरस तालुक्‍याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी दिली. 

शिष्यवृत्ती पूर्व उच्च प्राथमिकमध्ये माळशिरस तालुक्‍यातील राज्य गुणवत्ता यादीत तीन विद्यार्थ्यांनी पहिल्या दहा क्रमांकामध्ये अनुक्रमे तिसरा, पाचवा व दहावा क्रमांक पटकावला आहे. माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्‍यातील एकूण 54 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. 

गुणवत्ता यादीत स्थान पटकाविलेल्या शाळांची नावे व विद्यार्थी संख्या 
पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) गट (एकूण 33 विद्यार्थी) 

  • कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीव - 5; जि. प. आंबेमळा खुडूस - 2 (राज्य यादी - 1); जि. प. वाघोली - 2; जि. प. पिलीव मुले - 4; रणजितसिंह मोहिते पाटील विद्यालय, जाधववाडी - 1; जि. प. पिसेवाडी - 1; जि. प. बचेरी - 2; जि. प. मोरेमळा - 1; जि. प. गणेशगाव - 2; स. मा. वि. अकलूज - 1; जि. प. मेडद - 1; जि. प. तिरवंडी - 1; मॉडेल विविधांगी, माळीनगर - 1; चंद्रशेखर विद्यालय, श्रीपूर - 1; बा. ज. दाते प्रशाला, नातेपुते - 2; जि. प. माळेवाडी, बोरगाव - 1; गो. दे. प्रशाला, माळशिरस - 1; जि. प. माळेवाडी, अकलूज - 1; जि. प. तुपे वस्ती - 3. 

माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) (एकूण 54 विद्यार्थी) 

  • जिजामाता प्रशाला, अकलूज - 6; क. बा. पा. पिलीव - 11; चंद्रप्रभू इंग्लिश स्कूल - 4; बाणलिंग विद्यालय, फोंडशिरस - 2; महर्षी प्रशाला, यशवंतनगर - 3; चंद्रशेखर विद्यालय, श्रीपूर - 9; बा. ज. दाते प्रशाला, नातेपुते - 2; स. मा. वि. अकलूज - 7; गुलमोहर इंग्लिश स्कूल, माळीनगर - 1; भैरवनाथ विद्यालय, मेडद - 1; इंग्लिश स्कूल, वेळापूर - 2; हनुमान विद्यालय, शिंदेवाडी - 1; सदाशिव माने विद्यालय, माणकी - 1; यशवंतराव चव्हाण विद्यालय, फळवणी - 1; हनुमान हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, निमगाव - 1; जि. प. दसूर - 1; लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, माळशिरस - 1. 

सर्व पात्र विद्यार्थी व शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचे तालुक्‍याच्या सभापती शोभा साठे, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, विस्तार अधिकारी महालिंग नकाते यांनी अभिनंदन केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top