

Barshi police displaying the seized pistol, live cartridges and car after the arrest.
sakal
बार्शी शहर : बार्शी शहरापासून जवळच असलेल्या बाह्यवळण रस्त्यावर एका संशयित कारमधून काही गुन्हेगार भूमकडे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून बार्शी तालुका पोलिसांनी गुन्हेगारांच्या वाहनाचा पाठलाग करत एका संशयित आरोपीसह त्याच्याकडील एक पिस्टल आणि कारसह सहा लाखांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई तालुका पोलिसांच्या पथकाने रविवारी (ता. २८) मध्यरात्री २.३० वाजता केली.