
सोलापूर : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर चढलेल्या व्यक्तीला बुधवारी (ता. ३) पहाटेच्या सुमारास खाली उतरविताना झालेल्या धक्काबुक्कीत तो खाली पडला. दोघांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोघांविरूद्ध फौजदार चावडी पोलिसांत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी ठोठावली.