Road Accidentsakal
सोलापूर
Solapur Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण ठार; हाता-पायाला व तोंडाला गंभीर जखमा
Unidentified Vehicle Strikes Man: अपघातात गंभीर जखमी झालेल्या नीलकंठ याला बेशुद्ध अवस्थेत पोलिसांनी तातडीने शासकीय रूग्णालयात हलविले. त्याच्या हाता-पायाला व तोंडाला गंभीर जखम झाली होती. या अपघातात त्याचा मृत्यू झाला.
सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मधूबनसमोर एका भरधाव वाहनाने कर्नाटकातील नीलकंठ गौडपगौडा (रा.येकतापूर, जि. यादगिर) यास उडविले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या नीलकंठ याला बेशुद्ध अवस्थेत पोलिसांनी तातडीने शासकीय रूग्णालयात हलविले. त्याच्या हाता-पायाला व तोंडाला गंभीर जखम झाली होती. या अपघातात त्याचा मृत्यू झाला.