

City in Mourning: Solapur Remembers Its Man of Action
Sakal
सोलापूर : शहरात अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. चौकाचौकांत बॅनर उभारण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे हॉटेल्स, कार्यालये, शाळा व विविध संस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत होती. अपघातस्थळी पडलेली कागदपत्रे, सोशल मीडियावरील स्टेट्सवर दादांची छायाचित्रे आणि भावनिक शब्दांतून आदरांजली वाहिली. या घटनेच्या शहरभर शोकभावना उमटताना दिसून आल्या.