मंगळवेढ्यात नवरात्रात पर्यटनाची संधी,देखावे व रोषणाईची तयारी अंतीम टप्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

मंगळवेढ्यात नवरात्रात पर्यटनाची संधी,देखावे व रोषणाईची तयारी अंतीम टप्यात

मंगळवेढा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे मंगळवेढ्यातील नवरात्र महोत्सवावर गदा आली. मात्र यंदा जनजीवन पूर्ववत झाल्यामुळे मंगळवेढ्यात नवरात्राची तयारी जोमात सुरू झाली.त्यामुळे भाविकाबरोबर इतरांना नवरात्रात मंगळवेढ्यात दहा दिवसांसाठी पर्यटनासाठी मंगळवेढा संधी उपलब्ध झाली.

संताची भूमी म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेल्या मंगळवेढ्यामध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, गैबीपीर उरूस, दामाजी यात्रा,नवरात्र आदी धार्मिक महोत्सव सर्व धर्मियांच्या गुण्या गोविंदाने साजरा केली जात असतानाच मंगळवेढ्यात नवरात्र महोत्सवाची एक वेगळीच परंपरा आहे यामध्ये नवरात्र महोत्सव मंडळाचा अध्यक्षाचा मान मुस्लिम समाजाला देण्याचा आदर्श देखील मंगळवेढ्यानेच इतरांना घालून दिला शहर व ग्रामीण भागात नवरात्राची स्थापना मोठ्या उत्साहात होत असताना यंदा शहरातील विविध मंडळांनी विद्युत रोषणाई बरोबर ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देणारे,जिवंत देखावे उभे केले

जात आहेत.बौध्दीक मेजवानी देणारी व्याख्यानमाला,धार्मीक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे नियोजन केले असून रोषणाई,देखावे व कार्यक्रम पाहण्यासाठी मंगळवेढ्याबरोबर लगतच्या तालुक्यातील नागरिक दररोज संध्याकाळी मंगळवेढ्यास येत असतात यानिमित्ताने छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत तत्पूर्वी पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व नवरात्र महोत्सव मंडळाची बैठक घेऊन नवरात्र महोत्सव शांततेने साजरा करताना रस्त्यावर असणारे फलक व मंडळाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपयोग करावा जेणेकरून चोरीच्या घटना रोखता येतील.नवरात्रातील वाढती गर्दी लक्षात घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना नवरात्र मंडळांना यापूर्वीच पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी दिल्या.यंदाच्या जय भवानी नवरात्र मंडळ,नव महाराष्‍ट्र तरुण मंडळ,सप्तशृंगी तरूण मंडळ,यांचे कार्यक्रम विशेषत दर्शनीय असतात.

जनजीवन पूर्ववत झाल्यामुळे दर्शनीय केरळ मधील दुर्गा राजवाडा या देखाव्याचे तयारी सुरू आहे.यंदा केरळमधील 40 कलाकाराचे नृत्य,बंगलोर येथील 21 कलाकाराचे नृत्य पथक,तर मिरवणुकीसाठी कराडच्या नामांकित बॅड ला निमंत्रित केले.

प्रशांत गायकवाड,अध्यक्ष नव महाराष्‍ट्र तरुण मंडळ,सराफ गल्ली

Web Title: Mangalvedha During Navratri Tourism Scenery Illumination Final Stages

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..