

The court upheld the election officer’s decision regarding objections to three mayoral candidates in Mangalvedha
Sakal
मंगळवेढा : मंगळवेढा नगराध्यक्षपदाच्या तीन उमेदवाराच्या अर्जावर असलेल्या हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव दिलेला निकाल पंढरपूर न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस.सलगर यांनी कायम ठेवला.पण नगराध्यक्षपदाची निवडणूक नियोजित वेळेत की पुढे ढकलणार यावर निवडणूक आयोगाच्या निर्णायाची प्रतिक्षा लागून राहिली. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी रागिनी कांबळे यांच्या अर्जावरील व नगरसेवक प्रविण खवतोडे यांच्या अर्जावरील एकच सुचक असून खवतोडे यांचा अर्ज अगोदर तर रागीणी कांबळे यांचा अर्ज नंतर दाखल झाल्याने रद्दबातल ठरवला.