मंगळवेढा : सत्तेच्या मोहापायी विरोधकाकडून खालच्या पातळीवर वैयक्तिक आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खा. श्रीरंग बारणे

मंगळवेढा : सत्तेच्या मोहापायी विरोधकाकडून खालच्या पातळीवर वैयक्तिक आरोप

मंगळवेढा : सत्तेच्या मोहापायी खालच्या पातळीवर वैयक्तिक आरोप करून राज्यातील वातावरण दुषित करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू असून त्याला शिवसैनिकांनी तोंड देण्याची तयारी ठेवावी असे आवाहन मावळचे खा. श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केल.

शिवसंपर्क अभियान टप्पा 2 च्या अनुषंगाने येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले यावेळी निरीक्षक उद्धव कुमठेकर,जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे,सोलापूर जिल्हा प्रमुख गणेश वानकर,दामाजीचे संचालक राजीव बाबर, प्रा. येताळा भगत, तुकाराम कुदळे, गणेश गावकरे, सुनील दत्तू,सलीम खतीब, ज्ञानेश्वर कौडूभैरी, बंडू चव्हाण, शारदा जावळे, दीपक कसगावडे, महादेव साखरे, रामहरी जाधव, रेवणसिद्ध बिराजदार आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना खा.बारणे म्हणाले की, सत्तेच्या मोहापायी 105 आमदार घेऊन विरोधात विरोध करत बसले, व्यक्तिगत स्वरुपात नको ते आरोप केले ज्याला बोलता येत नाही तेही आरोप करू लागले ज्याला बोलता येत नाही.

त्याला संस्कार कळेनासे झाले, सध्या केंद्रीय इंत्रणेचा वापर करून शिवसेनेला जाणीवपूर्वक त्रास व अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र राज्याला दिशा देण्याचे काम मुख्यमंत्र्यानी केले आरोपाला प्रत्युत्तर न देता देशात नंबर एकचा मुख्यमंत्री बनण्याचा मान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिळवला.सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कौडूभैरी यांनी पोटनिवडणुकीत भाजप आ. समाधान आवताडे यांना पाठिंबा दिला होता त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्याबरोबर बंडू चव्हाण यांनीही प्रवेश केला या दोघांना खा बारणे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भगवा पताका हातात देण्यात आला

मंगळवेढ्यातील राजकारण पाण्या भोवती फिरत असून या पाण्यातून अनेकांना आमदार होण्याची संधी मिळाली मात्र पाण्याचा प्रश्न अजून मार्गी लागला नाही एकदा काय तो मंगळवेढ्याच्या पाणीप्रश्नाचा मुख्यमंत्र्याकडून सोक्षमोक्ष लावावा असे आवाहन शिवसेना जिल्हा उपप्रमुख गणेश वानकर यांनी मंगळवेढा बोलताना व्यक्त केले.यावर खा.बारणे यांनी इथला पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून लवकरच यामध्ये जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक लावून सकारात्मक भूमिका घेण्याची जबाबदारी पार पाडली जाईल असे आश्वासन दिले.

Web Title: Mangalvedha Personal Allegations Lower Level Opponent Power

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top