

Mangalwedha ZP Election
Sakal
मंगळवेढा : जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रभाग रचनेत लक्ष्मी दहिवडी गट राखीव होण्यासाठी चोखामेळानगर ग्रामपंचायतीतील मागासवर्गीची लोकसंख्या प्रशासनाने वाढवून दाखवल्याने तो गट राखीव झाला त्यामुळे तालुक्यातील भोसे गटावर अन्याय केल्याची हरकत शहाजी कांबळे यांनी घेतली. या संदर्भातील हरकतीचा अहवाल विभागीय आयुक्ताला सादर करण्यात आला त्यामुळे विभागीय आयुक्त यावर काय निर्णय घेण्यात याकडे लक्ष लागले.