Complaint Filed Against Mangalwedha Agricultural Market Committee
मंगळवेढा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा संचालक मंडळ बरखास्त करून समितीच्या संचालक मंडळाचे अवैधरित्या घेतलेले निर्णयाची चौकशी करून घेतलेले निर्णय रद्द करून बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती करून गाळे मूळ गाळेधारकांना परत अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस सांगोला दौऱ्यावर आले असता हे निवेदन आ.समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले या निवेदनावर गोपीनाथ माळी, विष्णुपंत मर्दा, अजित जगताप, सिद्धेश्वर माळी यांच्या सह्या आहेत.