Solapur News : मंगळवेढा येथे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, उद्या मतदान पथके रवाना

Mangalwedha Zilla Parishad Panchayat Samiti election preparation 2026 : मंगळवेढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. १८९ मतदान केंद्रांवर मतदानासाठी १२६४ कर्मचारी, २१७ पथके, ईव्हीएम यंत्रणा व पोलीस बंदोबस्ताची तयारी पूर्ण झाली आहे.
Mangalwedha Zilla Parishad Panchayat Samiti election preparation 2026

Mangalwedha Zilla Parishad Panchayat Samiti election preparation 2026

sakal

Updated on

मंगळवेढा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 आता अंतिम टप्प्यात आली असून या निवडणुकीसाठी मंगळवेढा स्थानिक प्रशासन सज्ज झाले आहे. सर्व मतदान पथके उद्या म्हणजेच दिनांक 6 रोजी मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत. मंगळवेढा तालुक्यात एकूण 4 जिल्हा परिषद गट असून 8 पंचायत समिती गण आहेत. तालुक्यात एकूण 189 मतदान केंद्र असून सर्व मतदान केंद्र मतदान प्रक्रियेसाठी सज्ज करण्यात आली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com