Solapur Political : जशा निवडणूका येतील तशी पात्र आणि चित्र बदलणारी चित्राताईं- भगीरथ भालके!

Bhagirath Bhalke : मंगळवेढ्यातील प्रचार सभेत भगीरथ भालके यांनी भाजप नेत्यांवर भावनांशी खेळ आणि दुटप्पी भूमिकेचा आरोप केला. नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत मतदारांना जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले.
Political Attack During Election Campaign

Political Attack During Election Campaign

Sakal

Updated on

मंगळवेढा : देवाची आणि रामाची भूमिका सांगणाऱ्या पक्षाच्या नेत्यानी मार्गशीर्ष महिन्यात खावा बटन दाबा बटन अशी चुकीच्या वल्गणा आणि महिलांच्या भावना दुखावणारी वक्तव्ये करून जशा निवडणूका येतील तशी पात्र आणि चित्र बदलणारी भाजप आ. चित्राताईंनी मुह मे सुरी आणि बगल मे राम हे दाखवून दिले. निवडणुकीत मतदारांनी असं बटन दाबा की निकाला दिवशी त्यांना मटणाशिवाय दुसरं काही आठवलं नाही पाहिजे असा खोचक टोला भगीरथ भालके यांनी लगावला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com