

Congress accuses BJP of misleading voters ahead of Mangalwedha polls
sakal
मंगळवेढा : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोगेश्वरी मंगल कार्यालयात झालेल्या काँग्रेस व मित्र पक्षाच्या विचार विनिमय बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर राज्य सचिव अॅड रविकरण कोळेकर,जिल्हा कार्याध्यक्ष अॅड नंदकुमार पवार, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष अॅड राहुल घुले, मारुती वाकडे ,अॅड अर्जुनराव पाटील, रामचंद्र वाकडे, मुरलीधर दत्तू,दत्तात्रय खडतरे, हणमंत दुधाळ,सुवर्णा चेळेकर,स्नेहल घुले, सुनिता अवघडे ,दिलीप जाधव, किसन सावंजी, राजाभाऊ मेथकुटे, आदि उपस्थित होते.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष शाटगार म्हणाले,निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मत चोरी करून सत्ता हस्तगत करणे व सत्तेतून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करणे हा कार्यक्रम सुरू आहे महागाई व जीएसटी या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक सुरू आहे.