Solapur : मंगळवेढ्यात दिमाखदार सोहळ्याने आश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

Chhatrapati Shivaji Maharaj : गेली महिनाभरापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या मंगळवेढा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण सकल मराठा समाजातील ज्येष्ठ मान्यवराच्या हस्ते आज सायंकाळी 5 वाजता ढोल ताशाच्या गजरात पुष्पवृष्टीसह फटाक्याच्या आतीषबाजीने करण्यात आले.
Historic moment for Mangalwedha

Historic moment for Mangalwedha

sakal

Updated on

मंगळवेढा : 26 ऑक्टोबर रोजी या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले होते परंतु काही अपरिहार्य कारणास्तव तो कार्यक्रम रद्द करण्यात आला त्यानंतर 2 नोव्हेंबरला होणारा कार्यक्रम उद्या सायंकाळी 6 वाजता होणार होता परंतु नगरपालिका निवडणुकीची संभाव्य आचारसंहिता लक्षात घेता तो कार्यक्रम आज दि.5 रोजी उरकण्यात आला यावेळी भैरवनाथ उद्योग समुहाचे अध्यक्ष अनिल सावंत,धनश्री परिवाराचे प्रा. शिवाजीराव काळुंगे,भगीरथ भालके, बबनराव अवताडे,अमर पाटील, माऊली पवार,रामचंद्र वाकडे, संजय आवताडे,युटोपियन शुगर्सचे रोहन परिचारक,भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, नंदकुमार पवार,चंद्रशेखर कौडूभैरी,संतोष रंदवे, मुरलीधर दत्तू ,राजेंद्र सुरवसे येताळा भगत, नारायण गोवे, भारत बेदरे, वैभव नागणे, गौरीशंकर बुरकुल, प्रतीक किल्लेदार, चंद्रकांत घुले, रामचंद्र कोंडूभैरी, भारत नागणे,प्रा तेजस्विनी कदम, प्रियदर्शनी महाडिक, सुप्रिया जगताप,अरुणा माळी,अरुणा दत्तू,तत्कालीन मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, मान्यवरासह सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Historic moment for Mangalwedha
कल्याण अवती-भवती
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com