

Farmers demand proper access to irrigation
sakal
मंगळवेढा : ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना जलसिंचन सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून शासनाने अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना सुरू केली. या योजनेतून विहीर खोऱ्यासाठी चार लाख रुपयाचे अनुदान निश्चित केले. याचा लाभ या प्रवर्गातील अनेक शेतकऱ्यांनी घेतला मात्र इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकरी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून विहीर खोदाईसाठी पर्याय देण्यात आला.