“Public initiative in Mangalwedha installs statues of great leaders; top state leaders invited for unveiling.”Sakal
सोलापूर
Solapur News:'मंगळवेढ्यात लोकसहभागातून विविध महापुरुषांचे पुतळे'; अनावरणासाठी अजित पवार, फडणवीसांना निमंत्रण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शहरात झालेल्या या कामाबद्दलची माहिती देऊन त्यांना लोकार्पणासाठी वेळ द्यावी अशी विनंती यावेळी करण्यात आली. तसेच मुख्यमंत्र्यांचीही वेळ घेऊन दोघांनीही पुतळ्यांच्या लोकार्पणाला यावे अशी विनंती केली.
मंगळवेढा: येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या सह विविध महापुरुषांच्या पुतळ्यांच्या अनावरणासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुतळा समितीच्या सदस्यांनी भेट घेऊन त्याबाबतची विनंती केली.

